मुंबई : स्टंट करणं किंवा काहीतरी एडवेंचरस करणं हे आजकालच्या तरुण मंडळींना फार आवडते. ते असे काही ना काही एडवेंचर करत असतात आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकतात. पहिलं तर असे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांना व्ह्युज मिळते. त्याव्यतिरिक्त त्यांना असे व्हिडीओ पोस्ट करून सर्वाना हे दाखवायचं असतं की, ते किती एडवेंचरस आहेत आणि ते आयुष्यात मोठा धोका पत्करायला तयार आहेत. सोशल मीडियावर आपल्याला असे व्हिडीओ वारंवार पाहायला मिळतात. जे पाहून आपल्याल देखील खूप भारी वाटतं आणि आपण देखील आयुष्यात असं काही करावं असं वाटत असतं.
तुमच्या ही मनात असं काही करण्याचा विचार करत असला, तर थांबा आधी हा व्हिडीओ पाहा. ज्यानंतर कदाचित तुम्ही असं पाऊल कधीही उचलणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बंजी जम्पिंग करणाऱ्या एका महिलेचा आहे. यादरम्यान या महिलेसोबत असा प्रकार घडतो की, तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहाणार नाही.
खरंतर जेव्हा ही महिला उंच डोंगरावरुन खाली उडी मारते, तेव्हा तिला दोरीनं बांधलेलं असतं आणि संपूर्ण सेफटी दिलेली असते. परंतु असे असू देखील या महिलेला बांधलेली दोरी तुटते आणि ही महिला सरळ खाली पडते.
नशीबानं खाली पाणी असल्यामुळे या महिलेला आपले प्राण गमवावे लागले नसणार, परंतु नक्की या महिलेसोबत काय घडलं, हे देखील काही कळलेलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच तो वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.
Would you go bungee jumping after seeing this? pic.twitter.com/EG5qpHgiux
— Vicious Videos (@ViciousVideos) March 12, 2022
हा व्हिडीओ ट्वीटर Vicious Videos नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला2 लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. तर त्याला 965 वेळा रिट्वीट देखील केलं गेलं आहे.
13 मार्च रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ 2012 चा आहे आणि तो झिम्बाब्वेमधील आहे. युजर्सनी याट्वीटवर युट्यूब व्हिडीओ शेअर करून महिला जिवंत असल्याचा दावा केला आहे.