Corona ने पुन्हा डोकं काढलं वर, अनेक देशांमध्ये धोका वाढला

corona cases in world : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Updated: Mar 18, 2022, 11:51 PM IST
Corona ने पुन्हा डोकं काढलं वर, अनेक देशांमध्ये धोका वाढला title=

Covid cases in india : भारतामध्ये कोरोनाची (Covid-19 Cases) ची स्थिती नियंत्रणात आहे. सध्या देशात 30 हजारांहून कमी एक्टिव केसेस आहेत. परंतु दक्षिण-पूर्व एशिया आणि युरोपमध्ये कोरोनाची स्थिती वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता भारत सरकार देखील अलर्टवर आहे. चीन (China) आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवले असून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Central Government alert states for corona cases)

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास तो वेळेत शोधला जावा आणि लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जावे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोनाच्या नियमांचे पालन या पाच धोरणावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चीनमध्ये विक्रमी वाढ

इतर देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सर्व राज्यांना जलद जीनोम सिक्वेन्सिंग आणि नमुन्यांची चाचणी यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच चीनला या प्राणघातक विषाणूच्या सर्वात मोठ्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचे विक्रमी रुग्ण वाढत आहेत.

भारतात सध्या दररोज 5 हजारांहून कमी केसेस येत आहेत. देशात गेल्या 24 तासांत संसर्गाची 2,528 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 3,997 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 29181 आहे.