Corona | चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट

कोरोनाचा जिथून उगम झाला त्या चीनमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट झालंय  

Updated: Mar 18, 2022, 10:07 PM IST
Corona | चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट    title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर सर्वकाही अगदी पूर्वपदावर आलंय. सर्व निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आता कुठे सर्व सावरत होतं. त्यात आता पुन्हा कोरोनाने डोकं वरं काढलंय. कोरोनाचा जिथून उगम झाला त्या चीनमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट झालंय. (corona outbreak in china central health secretary warns all states) 

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हात पाय पसरवायला सुरुवात केलीय. चीनमध्ये रुग्णांना रुग्णालयात हालहाल सोसावे लागत आहे.  चीनमधील याच वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार खडबडून जागं झालंय. केंद्र आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच  नागरिकांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहनही केलंय. 

चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय. त्यानंतर केंद्र सरकारनंही सर्व राज्यांना पत्र पाठवून अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. भारतात गेल्या 24 तासांत तब्बल149 जणांना जीव गमवावा लागलाय. चीनकडून येणारा धोका लक्षात घेऊन भारत सरकारनं कडक पावलं उचलण्यास सुरूवात केलीये. होळीनंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.