'संविधानाचा मसुदा तयार करणारा ब्राम्हणच'

दुसऱ्या विशाल ब्राम्हण बिझनेस समीटमध्ये केला दावा 

Updated: Jan 4, 2020, 10:08 AM IST
'संविधानाचा मसुदा तयार करणारा ब्राम्हणच' title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी केलेला दावा अतिशय चर्चेत आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा मसुदा एका ब्राम्हणांनी तयार केला आहे. दुसऱ्या विशाल ब्राम्हण बिझनेस समीटमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. 

राजेंद्र तिवारी यांनी या समीटमध्ये संविधानाचा मसुदा हा बी एन राव यांनी तयार केल्याचं म्हटलं. एवढंच नव्हे तर अभिजीत बॅनर्जीसह नऊ भारतीय नोबेल पुरस्कार विजेत्यांमध्ये आठ ब्राम्हण असल्याचा देखील दावा केला आहे. अहमदाबाद जवळील अडजाल येथे हे समीट होत आहे. 

ब्राम्हण असलेल्या त्रिवेदींनी म्हटलं आहे की,'तुम्हाला माहित आहे का, 60 देशांचे संविधान एकत्र आणून त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. तुम्हाला माहित आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हा मसुदा कुणी दिला? जेव्हा पण संविधानाचा विषय निघतो तेव्हा आपण अभिमानाने डॉ. आंबेडकरांच नाव घेतो.'

पुढे ते म्हणाले की,'मात्र आंबेडकरांच्या शब्दात मसुदा बी एन राव म्हणजे बंगालचे नरसिंह राव यांनी तयार केला.' या समीटमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील उपस्थित होते. त्रिवेदी यांनी पुढे सांगितलं की,'इतिहास साक्ष आहे की, ब्राम्हण कायम दुसऱ्यांना पुढे करत. हे रावच होते ज्यांनी आंबेडकरांना आपल्यापेक्षा पुढे ठेवले. आम्हाला आंबेडकरांचा अभिमानच आहे कारण 25 नोव्हेंबर 1949 मध्ये त्यांनी संविधान सभेत आपल्या भाषणातून याची कबुली दिली. ते म्हणाले की (आंबेडकरांच्या शब्दात),'जे श्रेय मला देण्यात आलं, ते खरं म्हणजे माझं नाही. ते बी एन राव यांच आहे.'