Rahul Gandhi Pub Video : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी एका पबमध्ये पार्टी करताना दिसत आहे. या व्हिडिओवरुन भाजपने (BJP) काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसनेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
राहुल गांधी त्यांच्या नेपाळी महिला मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. ही मैत्रीण कोण आहे असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. कोणत्या मैत्रीणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी काठमांडूला पोहोचले आहेत याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
पाहा कोण आहे ती मैत्रीण
राहुल गांधी यांच्या त्या मैत्रीणीचं नाव सुम्निमा उदास असं आहे. सुम्निमा उदासच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी सध्या काठमांडूमध्ये आहेत. सुम्निमा उदास हिचे वडिल भीम उदास यांनी आम्ही राहुल गांधी यांना मुलीच्या लग्नात येण्याचं निमंत्रण दिलं होतं असं सांगितलं आहे. भीम उदास यांनी म्यानमारमध्ये नेपाळचे राजदूत म्हणून काम केलं आहे. त्यांची मुलगी सुम्निमा ही सीएनएनची माजी पत्रकार आहे.
सुम्निमा उदास उच्चशिक्षित
राहुल गांधी यांची मैत्रीण सुम्निमा उदास हिचं लग्न नीमा मार्टिन शेरपा यांच्या सोबत होणार आहे. सुम्निमा उदास हिने अमेरिकेतील विद्यापीठातून पत्रकारिता केली आहे. तसंच ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. तिने पत्रकार म्हणून काम केलं आहे. सुम्निमा उदास हिने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचं प्रकरणही कव्हर केलं होतं. 2014 मध्ये सुम्निमा उदास यांनी अमेरिकन जर्नालिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता.
राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल
राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले होते. काल ते त्यांची मैत्रिण सुम्निमा उदास हिच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले. दरम्यान, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहे.
भाजपचा काँग्रेसवर निशाणा
राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मात्र राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत आहे, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करत आहे.
राहुल गांधी राजकारणात गंभीर नसल्याचा आरोपही भाजपने केला आहे.