मुंबई : Aadhaar Card : तुमचे आधार कार्ड बनावट आहे की नाही (Aadhaar Card Fake or Not) हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे. आधार कार्डच्या माध्यमातून फसवणूक होईल, म्हणून आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांचे आधार कार्ड बनावट आहे की खरे हे त्यांनी तपासून घ्यावे.
प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड किती महत्त्वाचे झाले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे कोणापासून लपून राहिलेले नाही. आजच्या काळात बँकेपासून ते कोणत्याही सरकारी कामापर्यंत हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. तुम्हाला सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा तुमच्या मुलाचा शाळेत प्रवेश घ्यायचा असेल, आधार कार्ड हेच उपयोगी पडते. अगदी बँकेत खाते उघडण्यापासून ते शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापर्यंत हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे थांबतात.
मात्र, आधार कार्ड जितके महत्वाचे आहे. तितकेच धोकादायक आहे. कारण लोक याच्या माध्यमातून फसवणूक करु लागले आहेत आणि काही प्रकरणे मोठी झाली आहेत. या फसवणुकीमुळे, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे की, त्यांचे आधार कार्ड बनावट आहे की खरे हे त्यांना कसे कळेल.
आधार कार्ड क्रमांक 12 अंकी असतो हे आपणा सर्वांना माहीतच आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या नंबरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी तुमचा आधार क्रमांक बनावट तर नाही ना याची खात्री करा. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1. सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.
2. यानंतर तुम्हाला My Aadhaar पर्यायावर जावे लागेल.
3. नंतर तुम्हाला येथे अनेक सेवांची यादी दिसेल.
4. येथे तुम्हाला Verify an Aadhaar नंबर वर क्लिक करावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
6. नंतर तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल.
7. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. असे केल्याने तुम्हाला एका पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
8. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, वय, लिंग आणि राज्य तपशील द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट.