मुंबई : वाढत्या महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजी येत्या महिन्यात 10 ते 11 टक्क्यांनी वाढणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) रिपोर्टनुसार, ऑक्टोबरमध्ये सरकार गॅसच्या किंमतीत जवळपास 76 टक्के वाढ करणार आहे.
गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे गाडी चालवणे आणि जेवण बनवणे महागणार आहे. पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. डॉमेस्टिक गॅस पॉलिसी 2014 अंतर्गत प्रत्येक सहा महिन्यात नॅच्युरल गॅसच्या किंमती निश्चित केल्या जातात. यानुसार दरातील पुढील बदल 1 ऑक्टोबरला होणार आहे. ऑक्टोबरनंतर हा बदल एप्रिल 2022 मध्ये होणार आहे.
ब्रोकरेजनुसार, 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 काळाकरता APM या एडमिनिस्टर्ड रेट 3.1अमेरिका डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट होणार आहे. जी आता 1.79 डॉलर असेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी 6 आणि बीपी पीएलसी सारख्या क्षेत्रात 7.4 डॉलर वाढ होणार आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, शहर गॅस वितरकांना (सीजीडी) ऑक्टोबरमध्ये किंमती 10-11 टक्क्यांनी वाढवाव्या लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील कलानुसार, एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये APM गॅसची किंमत US $ 5.93 प्रति आणि ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान US $ 7.65 प्रति अपेक्षित आहे.
एप्रिल 2022 मध्ये सीएनजी आणि नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) किंमती 22-23 टक्क्यांनी आणि ऑक्टोबर 2022 मध्ये 11-12 टक्क्यांनी वाढतील. 2022 च्या पहिल्या सहामाहीत APM गॅसची किंमत $ 1.79 प्रति वरून 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत $ 7.65 प्रति झाली. MGL आणि IGL ला ऑक्टोबर 2021 आणि ऑक्टोबर 2022 दरम्यान 49-53 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. गॅसच्या किंमतीत वाढ केल्याने ओएनजीसी आणि ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सारख्या खाजगी कंपन्यांचे मार्जिन वाढण्यास मदत होईल.