मराठा आरक्षणावरून काहींना समाजात प्रक्षोभकता वाढवायची आहे-शरद पवार

मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नसून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. म्हणून

Updated: Sep 11, 2020, 03:06 PM IST
मराठा आरक्षणावरून काहींना समाजात प्रक्षोभकता वाढवायची आहे-शरद पवार title=

नवी दिल्ली : आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नसून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. म्हणून मराठा आरक्षण संदर्भात ऑर्डिनन्स आणला जावा, अशी सूचना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

त्याचवेळी मराठा आरक्षणावरून काहींना समाजात प्रक्षोभकता वाढवायची असल्याचा आरोप, शरद पवार यांनी विरोधकांचं नाव न घेता केला. 

तर भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी स्थापन करता येऊ शकते असं आपल्याला काहींनी सांगितलं. म्हणून त्याचा विचार करण्यात आल्याचं शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती हा दुर्दैवी निर्णय आहे. सरकार न्यायालयात मुद्दे मांडण्यात कमी पडलंय अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

मराठा आरक्षण प्रकरणी नोकरभरती बंद केल्याचं सरकार म्हणालं त्यामुळे धक्का बसला असं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षण हा कायदा राज्याचा आहे, केंद्राचा नाही असं त्यांनी म्हटलंय.