Cleaning Tips: पितळेच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवायचीय, 'या' टिप्स वापरा

पितळेच्या भांड्यांना येईल झळाली, फक्त या गोष्टी वापरा

Updated: Nov 12, 2022, 12:04 AM IST
Cleaning Tips: पितळेच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवायचीय, 'या' टिप्स वापरा  title=

मुंबई : स्टीलची भांडी स्वच्छ करणे खुप सोपे असते, मात्र त्या तुलनेत पितळीची भांडी (Brass utensils) फारच कठीण असतात. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. नुसत्या साध्या साबणाने पितळेची भांडी (Brass utensils) साफ होत नाही. त्यासाठी इतर धुण्याचे पर्याय वापरावे लागतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी काही सोपे पर्याय  घेऊन आलो आहोत. त्यांना वापरून, तुम्ही पितळ आणि तांब्याची भांडी सहज चमकवू शकता.

बेकिंग सोडा वापरा

पितळेचे भांडी (Brass utensils)  चमकण्यासाठी 1 चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घेऊन त्याचा पेस्ट बनवा. ही पेस्ट पितळेची भांडी आणि मूर्तींवर चांगली चोळून घ्या. सर्व ठिकाणी पूर्णपणे पेस्ट लावल्यानंतर ती कोमट पाण्याने चांगली धुवा. त्यानंतर भांडी चमकू लागतील.

व्हिनेगार

पितळेची भांडी (Brass utensils) आणि मूर्तींचा काळेपणा दूर करण्यासाठी व्हिनेगार प्रभावी आहे. यासाठी पितळेच्या वस्तूंवर व्हिनेगार टाकून त्यावर मीठ चोळा. आता कोमट पाण्याने धुवा. भांड्यांवर व्हिनेगार जादूसारखे काम करेल आणि भांडी चमकू लागतील.

लिंबू-मीठ

पितळेची भांडी (Brass utensils) स्वच्छ करण्यासाठी 1 चमचे मीठ आणि लिंबाचा रस घ्या. दोन्ही मिक्स करून भांड्यांवर घासून नंतर कोमट पाण्याने धुवा. थोड्याच वेळात तुमच्या पितळेची चमक परत येईल.

चिंच

पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यांची (Brass utensils)  हरवलेली चमक परत आणण्यासाठी चिंच वापरून पहा. यासाठी चिंच काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि 15 मिनिटांनी चिंचेचा लगदा बाहेर काढा. आता हा लगदा भांड्यावर चांगला घासून घ्या. तुमची जुनी भांडी चमकतील.