चीनच्या कुरापती सुरूच! भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर नजर

चीन नागरिकांना एसटीएफने केले अटक 

Updated: Jun 23, 2021, 09:54 AM IST
चीनच्या कुरापती सुरूच! भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर नजर title=

मुंबई : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या नागरिकांना पकडण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील वेगवेगळ्या एजन्सी भारतीय संरक्षण मंत्रालयाची वेबसाइटसह केंद्र सरकारच्या इतर वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसटीएफच्या सुत्रांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. 

भारत-बांग्लादेश सीमेतून भारतात अवैध प्रवेश करणाऱ्या चीनी नागरिकांना पकडण्यात आलं. या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी एजन्सीने बंगलुरूमधील एका कंपनीला निशाणा बनवलं जे मंत्रालय आणि बीएसएनएलशी जोडली गेली आहे. 

भारताच्या संरक्षण प्रणालीत लक्ष घालण्याच्या प्रयत्नात 

एसटीएफच्या अधिकारीने दिलेल्या माहितीनुसार, अनेक एयरोप्सेस कंपन्या देखील या एजन्सीच्या निशाण्यावर आहेत. अटक केलेल्या चीनी नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील एजन्सी भारतातील संरक्षण प्रणालीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. या एजन्सीने भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या विभिन्न वेबसाइटला हॅक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. 

भारतात घुसण्यामागच्या कारणाचा शोध 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीएफ या एजन्सीबाबत तपास करत आहे. त्याचप्रमाणे भारतात घुसखोरी करण्यामागचा हेतू काय होता. तसेच अटक करण्यात आलेले चीनचे नागरिक हे दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत का? याचा देखील तपास केला जात आहे. 

मोबाइल फोन आणि लॅपटॉप अनलॉक करण्याचा प्रयत्न 

12 जून रोजी अटक करण्यात आलेल्या चीनच्या नागरिकाकडे मोबाइल फोन आणि लॅपटॉप आहेत. हा अनलॉक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे उघडणं अतिशय कठीण झालं आहे.