सिक्कीम : सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय. कोणत्याही परिस्थितीत चीन मागे हटणार नाही, भारतानं कोणत्याही भ्रमात राहू नये, असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता वू किआन यांनी म्हटलंय.
त्याच वेळी ब्रिक्स संघटनेच्या बैठकीमध्ये भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे स्टेट काऊंसिलर यांग जिएची यांच्यादरम्यान डोकलामच्या मुद्द्यावर चर्चा शक्य असल्याचंही किआन यांनी म्हटलंय. 27 आणि 28 जुलैला होणाऱ्या या बैठकीसाठी डोवल येत्या आठवड्यातच बिजिंगला रवाना होण्याची शक्यता आहे.