नवी दिल्ली : रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर रेशन कार्ड आधारसोबत (Aadhaar-Ration Link) लिंक केलं नसेल, तर लवकरात लवकर करुन घ्या. केंद्र सरकारने कार्डधारकांना एक आणखी संधी दिली आहे. आधी रेशन कार्ड आधारसह लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख होती. मात्र आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. घरबसल्या रेशन कार्ड-आधार लिंक कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात. (central government has extended date to 30 june for ration card linking with aadhar)
रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य मिळतं. केंद्र सरकारच्या 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा देशातील कोटी जनतेला फायदा मिळतोय.
रेशन कार्डाचे अन्य फायदेही आहेत. जर तुमचं रेशन कार्ड आधारसह लिंक असेल, तर तुम्ही देशातील कुठल्याही रास्त भाव दुकानातून अन्नधान्य घेऊ शकता.
-आधारच्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा.
-'Start Now'या पर्यायावर क्लिक करा.
- राज्याच्या उल्लेखासह संपूर्ण पत्ता भरा.
-'Ration Card Bedefit' या पर्यायवर क्लिक करा.
- आधार नंबर, रॅशन कार्ड नंबर, इमेल आयडी आणि विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक भरा.
-आधारसह लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
- ओटीपी सबमिट केल्यानंतर 'Process Complete'असा मेसेज स्क्रिनवप येईल.
आधार कार्ड रेशन कार्डशी ऑफलाइन देखील लिंक करू शकता. त्यासाठी आधार कार्डची प्रत, रेशन कार्डाची झेरोक्स आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्र जवळच्या रास्त भाव दुकानात जमा करावी.