Mutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...

Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा  जमवू शकता.  

Updated: Nov 11, 2022, 10:38 AM IST
Mutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...   title=
संग्रहित छाया

Returns of Mutual Fund SIP : तुम्ही जर थोडी थोडी बचत करण्याची स्वत:ला सवय लावून घेतली तर तुमच्याकडे बक्कळ पैसा जमा होऊ शकतो. तसेच आपल्या मुलीच्या विवाहासाठी (marriage) पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा  (earn money) जमवू शकता.  

दरम्यान, तुम्ही गुंतवणूक करताना विचार करुन गुंतवणूक केली पाहिजे. अन्यथा नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घ्या. म्हणजे वेळेवर गुंतवणूक करत राहायची किंवा ती पुढे सुरु ठेवायची, यावर भर द्या. तुम्ही कुठे आणि कशी गुंतवणूक करता यावर सगळं अबलंबून आहे. अधिक जाणून घ्या गुंतवणुकीबाबत ही गोष्ट.

SIP मध्ये गुंतवणूक करा 

तुम्हाला चांगले पैसे पाहिजे असतील तर तुमच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हा एक चांगला पर्याय आहे. एसआयपीद्वारे (SIP) तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्ही दरमहा किमान 500 रुपये गुंतवू शकता.

फ्रँकलिन टेपलटन ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या एसआयपी (SIP) कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा 1000 रुपये गुंतवले तर तुम्ही 20 वर्षांत 20 लाख रुपये कमवू शकता. ही गुंतवणूक सरासरी 12 टक्के वार्षिक व्याजाने करण्यात येऊ शकते.

7 वर्षांत 50 लाख रुपये जमा

तुम्हाला मोठा निधी जमवायचा असेल तर SIPमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल.  त्यासाठी 7 वर्षांत 50 लाखांचा निधी तयार करण्यासाठी, तुम्हाला दरमहा 40,000 रुपये गुंतवावे लागतील. कॅल्क्युलेटरनुसार सरासरी CAGR परतावा 12 टक्के गृहीत धरला तर ही रक्कम सहज होईल. असे दिसून आले आहे की काही समभाग दीर्घ कालावधीत चांगले परतावा देतात.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरु करणे आवश्यक नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 100 रुपयेही गुंतवू शकता. पण जर तुम्हाला SIP द्वारे गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 500 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही नियमितपणे दर महिन्याला एवढी गुंतवणूक केली तर 20 वर्षात ही रक्कम जवळपास 5 लाख रुपये जमा होतील.

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)