वऱ्हाड्यांनी भरलेली बस दरीत कोसळली, 45-50 जण असल्याची शक्यता

वऱ्हाड्यांनी भरलेल्या बसला मोठा अपघात झाला आहे. ही बस खोल दरीत कोसळली आहे.  

Updated: Oct 4, 2022, 09:20 PM IST
वऱ्हाड्यांनी भरलेली बस दरीत कोसळली, 45-50 जण असल्याची शक्यता  title=

मुंबई : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. वऱ्हाड्यांनी भरलेल्या बसला मोठा अपघात झाला आहे. ही बस खोल दरीत कोसळली आहे. बसमध्ये 45-50 जण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघतात जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. (bus carrying around 45 to 50 people falls into a gorge on rikhnikhal birokhal road near Simdi village in pauri garhwal district at uttarakhand) 

हा अपघात उत्तराखंडमधील पौडी गढवाल (pauri garhwal) जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ (Simdi village) झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य सुरु आहे. तसेच स्थानिक नागरिकही यंत्रणेला बचावकार्यात मदत करत आहेत. दरम्यान या अपघातात कुणाचा मृत्यू झालाय का किंवा कुणी जखमी असल्याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र जखमींचा आकडा हा जास्त असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.