किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार

केंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती..  या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.

वनिता कांबळे | Updated: Jul 23, 2024, 09:44 PM IST
किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार title=

Budget 2024  :  देशाच्या 2024 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलाय...जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही... 3 लाखांपर्यंच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाहीये...मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केलीय...नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत... नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे... तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय...

नवी करप्रणाली कशी असेल?
0 ते 3 लाख उत्पन्नावर शून्य टक्के कर लागले. 3 ते 7 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर,  7 ते 10 लाख उत्पन्न – 10 टक्के कर,  10 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर,  12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर, 15 लाखांवर उत्पन्न – 30 टक्के कर भरावा लागेल. 

नव्या करप्रणालीनुसार आधी किती टॅक्स भरावा लागत होता आणि आता किती टॅक्स भरावा लागणार आणि कितीची बचत होणार आहे त्यावर एक नजर टाकुया

  • 0 ते 3 लाख उत्पन्न – NIL                  0 ते 3 लाख उत्पन्न          NIL
  • 3 ते 6 लाख उत्पन्न – 15 हजार           3 ते 7 लाख उत्पन्न           20 हजार 
  • 6 ते 9 लाख उत्पन्न – 30 हजार          7 ते 10 लाख उत्पन्न           30 हजार
  • 9 ते 12 लाख उत्पन्न – 45 हजार         10 ते 12 लाख उत्पन्न         30 हजार
  • 12 ते 15 लाख उत्पन्न – 60 हजार        12 ते 15 लाख उत्पन्न        60 हजार
  • 15 ते 20 लाखांवर उत्पन्न – 1.5 लाख    15 लाखांवर उत्पन्न          1.5 लाख
  • स्टँडर्ड डिडक्शन -   75 हजार                टॅक्स बचत                 - 17 हजार 500

नवीन कर स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना किमान 17 हजार 500 रुपयांची बचत करता येणार आहे. तर जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार नाही.  त्यामुळे करदात्यांना फार नाही पण थोडासा दिलासा मिळालाय असंय म्हणावं लागेत..