Gold Silver Rate Today: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असताना सोने आणि चांदीच्या दरांत साततत्यानं (Gold Price Hike) वाढ होत आहे. त्यातच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज (2 फेब्रुवारी) लग्नसराईच्या काळात सोन्याचे भावही गगनाला भिडले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत जोरदार उसळी पाहायला मिळत असून आज सोन्याचा दर 10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजाराच्या घरात पोहोचला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढत.
अर्थसंकल्पानंतर गुरुवारी सोन्याने (Gold) 700 रुपयांच्या वाढीनंतर सार्वकालिक उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागली आहे. आता चांदी 71 हजार 250 रुपये किलोवर पोहोचली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चांदीचे दर 69 हजार 445 प्रतिकिलो होते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% वरून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतरच भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या. तसेच केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. यामुळे 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.
1 फेब्रुवारी 2022 रोजी तो 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्यानंतर तो आता 58 हजार 689 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 10,681 रुपयांनी (20%) वाढली आहे.