Union Budget 2022 | बिटकॉइनसह 'या' क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30% कर

आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी आरबीआय देशाचे स्वतःचे डिजिटल चलन लाँच करणार आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 20% कर देखील लावला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

Updated: Feb 1, 2022, 03:27 PM IST
Union Budget 2022 | बिटकॉइनसह 'या' क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30% कर title=

नवी दिल्ली :  अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने 2022-23 पासून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून 'डिजिटल करन्सी' सादर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, क्रिप्टोकरन्सीवर कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचे डिजिटल चलन सुरू केले जाईल
अर्थमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे, की ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून, भारतीय रिझर्व्ह बँक 2022 सालापासून म्हणजेच या वर्षापासूनच देशाचे स्वतःचे डिजिटल चलन सुरू करेल.

निर्मला सीतारामन जी म्हणतात की डिजिटल चलनाच्या आगमनाने, डिजिटल अर्थव्यवस्थेला खूप चालना मिळेल आणि चलन व्यवस्थापन प्रणाली देखील खूप स्वस्त होईल.

या डिजिटल चलनाला आपल्या देशाची क्रिप्टोकरन्सी असेही म्हणता येईल.

बिटकॉइन कमाईवर 30% कर
अर्थसंकल्पात बिटकॉइनवर बंदी घालण्याबाबत काहीही स्पष्टता नाही. आतापासून बिटकॉइन इत्यादींच्या कमाईवर कर लावला जाणार असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. 

बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सी मालमत्तांवर 30% कर आणि 1% TDS देखील या डिजिटल मालमत्तांच्या आभासी हस्तांतरणासाठी लागू होईल. जर क्रिप्टोकरन्सी एखाद्याला भेट म्हणून दिली असेल, तर भेटवस्तू प्राप्तकर्त्याला कर भरावा लागेल.