जिओला टक्कर देण्यासाठी BSNLची जबरदस्त ऑफर

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अनेक नवीन प्रीपेड योजना बाजारात आणल्या आहेत. कंपनीने 118 रुपयांची नवीन प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक 1 जीबी 3 जी व 4 जी डेटा मिळत आहे. यासह,  ग्राहकाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2018, 12:01 AM IST
जिओला टक्कर देण्यासाठी BSNLची जबरदस्त ऑफर title=

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अनेक नवीन प्रीपेड योजना बाजारात आणल्या आहेत. कंपनीने 118 रुपयांची नवीन प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक 1 जीबी 3 जी व 4 जी डेटा मिळत आहे. यासह,  ग्राहकाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळत आहे. 

दिल्ली आणि मुंबई सर्कलच्या रोमिंग भागात अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकालाला रिंग बॅक टोनचा पर्याय देखील मिळत आहे. परंतु हे केवळ तामिळनाडू मंडळासाठी आहे.

बीएसएनएलने जिओच्या ९८ रुपयांच्या योजनला उत्तर देण्यासाठी ११८ रुपयांची योजना सुरू केली आहे. जिओच्या प्लॅनमध्ये, 2 जीबी 4 जी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळत आहे. यासह, ग्राहकांना 28 दिवसांसाठी जिओची सदस्यता देखील मिळेल.

याशिवाय, बीएसएनएलने आता आणखी 379 रुपयांचा प्लॅन जारी केला आहे. ज्यामध्ये 4 जीबी 3 जी व 4 जी डेटा दररोज मिळत आहे. तसेच बीएसएनएल ते बीएसएनएल कॉलिंगसाठी अमर्यादीत वेळ देण्यात आलेय.