वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा मात्र मुलीने लग्न करण्यासाठी नकार दिला.

Updated: Mar 30, 2022, 09:32 PM IST
वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल title=

मुंबई : उत्तर प्रदेशातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. येथे कुटुंबीय आपल्या नव्या सुनेच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. पण नववधू तर घरी आलीच नाही, उलट  त्यांच्या मुलाचा मृतदेह मात्र घरी आला. या प्रकारानंतर संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. नक्की असं या लग्नात काय घडलं असावं किंवा असा कोणता प्रसंग आला असावा असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

ही घटना उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथील आहे. येथील विनोद नावाच्या व्यक्तीचं लग्न होणार होतं, मात्र त्याने आत्महत्या केली होती. या मुलाच्या आत्महत्येचे कारण, हे असं कारण आहे, ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसावा.

वास्तविक, फारुखाबादच्या कायमगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या मुन्ना लाल यांनी त्यांच्या मुलगा विनोदचा विवाह अजमापूर गावातील ललितासोबत निश्चित केला. सर्वांनी आनंदाने होकार देखील दिला. सर्व विधीही पूर्ण झाले आणि मिरवणुकीची वेळही आली. मुलीकडच्यांनी त्यांचे स्वागत देखील केले. परंतु जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा मात्र मुलीने लग्न करण्यासाठी नकार दिला.

खरंतर वरमाला घालण्यासाठी ललिता आणि विनोद दोघेही स्टेजवर आले. त्या दोघांच्याही हातात फुलांचा हार होता. परंतु जेव्हा ललिताने विनोदचा चेहरा पाहिला तेव्हा ती आल्या पावली पुन्हा परतली. हे पाहून सगळ्यांना धक्का बसला आणि ते ललिताला थांबवण्याचा प्रयत्न करु लागले.

ललिताला लग्न न करण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली की, "मुलगा खूप सावळा आहे, म्हणून मी लग्न करु शकत नाही."

लिलिताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु तरीही अनेकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही नववधू काही ऐकायला तयार नव्हती. अखेर नवऱ्याकडच्यांना आपल्या मंडळींना घेऊन पुन्हा परतावं लागलं.

विनोदला आत्महत्येशिवाय पर्याय दिसला नाही

आपलं लग्न आपल्या रंगामुळे तुटलं. हा विचार विनोदला सतत वेदना देत होता. आता आपल्याशी कोणीही लग्न करणार नाही या विचाराने विनोदने अखेर आत्महत्येचं पाऊल उचललं. त्यानं गळफास लावून आत्महत्या केली.

आपल्या मुलाच्या बायकोला घरी आणायला निघालेल्या बापाला आपल्याच मुलाच्या मृतदेहाला खांदा द्यावा लागेल असा कोणी विचार देखील केला नसावा. परंतु समाजातील लोकांच्या रंगावरील भेदामुळे आज एका बापावर अशी वेळ आणली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x