प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांतीच्या सणाने होते. या दिवशी वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. नवीन वर्षाच्या अगदीच 14 दिवसांनी हा दिवस साजरा केला जातो. आकाश पतंगबाजी करुन तिळगुळ वाटून हा आनंद लुटला जातो. या पाठोपाठ 'किंक्रांत' असते. या दिवसाला करिदिन असे देखील म्हटले जाते. पण किंक्रांत म्हणजे काय? पाहूया.
किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा चांगले काम केले जात नाही. यंदा किंक्रांत ही 15 जानेवारी रोजी आहे.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवला गेला आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. कोणतेही शुभ काम या दिवशी करु नये.
तसेच गावातील मंडळींनी खास करुन स्त्रियांनी शेणात हात घालू नये.
किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास टाळावा.
घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा. सर्वांशी आदराने वागा.
केर काढण्यापूर्वीच केस विंचरा
कुलदैवताची आणि देवाची पूजा, तसेच नामस्मरण करा.
तसेच किंक्रांतीच्या दिवशी पूजा करुन देवाला गोड नैवेद्य दाखवा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)