COVID-19 : तोंड येणे, दाढ दुखी... कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

कोरोना काळात अनेक लक्षणं समोर आली आहेत. ज्यामध्ये आता आणखी काही लक्षणांचा समावेश झाला आहे.

Updated: Mar 30, 2022, 08:33 PM IST
COVID-19 : तोंड येणे, दाढ दुखी... कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका title=

Covid 19 Symptoms : कोरोना महामारीला आता जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. कोरोना काळात या विषाणूबद्दल बरीच माहिती वैज्ञानिकांनी गोळा केली. पण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल शोध सुरु आहे. या रोगाची अनेक लक्षणं आतापर्यंत समोर आली. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, चव जाणे आणि वास कमी होणे अशा गोष्टींचा अनुभव अनेकांना आला. लसीकरण झाल्यानंतर त्याचा धोका कमी झाला असला तरी विषाणू अजून संपलेला नाही. कोरोना विषाणूची आता इतर लक्षणे देखील पुढे येत आहेत. 

कोरोना विषाणूचा दातांच्या आरोग्यावर परिणाम

कोरोना व्हायरस ACE2 नावाच्या रिसेप्टर्सद्वारे आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि हे रिसेप्टर्स आपल्या तोंड, जीभ आणि हिरड्यांमध्ये देखील असतात. त्यामुळे, ज्या लोकांचे तोंडाचे आरोग्य खराब आहे त्यांच्याकडे ACE2 रिसेप्टर्स जास्त असतात. संशोधनात असेही दिसून आले आहे की दातांच्या समस्या असलेले लोक देखील गंभीर COVID-19 संसर्गास बळी पडू शकतात.

जिभेबाबत कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती?

कोरोना विषाणूचा तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याची लागण झालेल्या अनेक रुग्णांना तोंडात फोड येणे, जिभेवर सूज येणे, तर अनेकांनी तोंडात व्रण येण्याच्या तक्रारीही केल्या आहेत. अशा लक्षणांमुळे जेवण करताना त्रास होतो.

या लक्षणांची मुख्यतः दोन कारणांसाठी कमी चर्चा केली जाते. पहिले कारण म्हणजे ही लक्षणे सामान्य आहेत. पण ही लक्षणे कमी रुग्णांमध्ये आढळतात, त्यामुळे त्यांच्यावर कमी चर्चा होते. दुसरे कारण म्हणजे ते विषाणूच्या इतर लक्षणांपेक्षा कमी गंभीर आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)  म्हणते की, ओमायक्रॉनची लक्षणे, जसे की सौम्य सर्दी आणि फ्लू यांच्याकडे देखील दुर्लक्ष करू नये. WHO ने वारंवार इशारा दिला आहे की हा डेल्टा पेक्षा कमी गंभीर असू शकतो, परंतु तरीही त्याचा धोका कायम आहे.