भयानक! ....म्हणून बॉयफ्रेंडच्या बापाने दोनवेळा शारीरिक अत्याचार केला

प्रियकर आणि त्याचे वडिल दोघांच्या अत्याचाराला बळी पडल्याने तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणीने दोघा पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल करत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.

Updated: Nov 27, 2022, 04:51 PM IST
भयानक! ....म्हणून बॉयफ्रेंडच्या बापाने दोनवेळा शारीरिक अत्याचार केला title=

Criem News, भोपाळ: एका तरुणीला प्रेमाची फार मोठी किंमत मोजावी लागली. प्रेमात या तरुणीला भयानक धोका मिळाला आहे. या तरुणीवर फक्त प्रियकरानेच नाही तर प्रियकराच्या पित्याने देखील दोन वेळा शारीरिक अत्याचार केला आहे. मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे(Criem News). 

पीडीत तरुणी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील राहणारी आहे. तरुणी  एका कॉस्मेटिक दुकानात कामाला होती. याच दुकानात तिच्यासह काम करणाऱ्या एका तरुणासह तिची ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
यानंतर लग्नाचे आमिष दाखवत आरोपी तरुणाने या तरुणीसह अनेकदा शारिरीक संबधन प्रस्थापित केले. मात्र तरुणीने लग्नाचा तगादा लावूनही तो टाळाटाळ करत होता. 

यामुळे तरुणीने बॉयफ्रेंडच्या वडिलांशी संपर्क साधला. यानंतर तिच्या बॉयफ्रेंडच्या वडिलांनी तिला घरी रहयाला बोलावले. या दरम्यान त्याच्या वडिलांनी या तरुणीवर दोनवेळा शारिरीक अत्याचार केला. यानंतर त्यांनी देखील लग्नासाठी टाळाटाळ करत तरुणीला घराबाहेर काढले.

प्रियकर आणि त्याचे वडिल दोघांच्या अत्याचाराला बळी पडल्याने तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणीने दोघा पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल करत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.