PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Updated: Nov 27, 2022, 04:49 PM IST
PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत title=

PAN Aadhaar Card Link Process: पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही मुदत उलटून गेल्यानंतर काही जणांनी पॅनकार्ड (PAN Card) आधारशी (Aadhaar Card) लिंक केलेलं नाही.मात्र 31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल, असे आयकर विभागाने म्हटले आहे. पॅन कार्ड निष्क्रिय असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे पॅन कार्ड कुठेही वापरू शकणार नाही. म्हणजेच तुमचे पॅन कार्ड फक्त प्लास्टिकचा तुकडा राहील. याबाबत आयकर विभागाने नुकतेच एक ट्विटही केले होते.

पॅन आणि आधार लिंक करताना इतका दंड

आयकर विभागाच्या परिपत्रकानुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक केले नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. आता आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करायचं असेल तुम्हाला 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. एवढेच नाही तर 31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही तुमचे आधार आणि पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसे लिंक करावे

पॅन कार्ड आणि आधार कार्ड ऑनलाइन अगदी सहजपणे लिंक करता येतात. सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incometaxindiaefiling.gov.in/ वर जा. जर तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर रजिस्टर नसाल तर तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. यासाठी तुम्हाला पॅन तपशील टाकून ओटीपी मिळेल. ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यासाठी पासवर्ड तयार करावा लागेल. यानंतर लॉगिनवर क्लिक करून पॅन नंबर, युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका आणि लॉग इन करा.

बातमी वाचा- Fixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा

लॉग इन केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगितले जाईल. जर तुम्हाला ही पॉप-अप विंडो दिसत नसेल, तर मेनूमध्ये जाऊन प्रोफाइल सेटिंग्जवर क्लिक करा. तिथे आधार लिंकवर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी बाबी स्क्रीनवर दिसतील. ते तपासल्यानंतर, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि लिंक नाऊ बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले जाईल.