VIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?

VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र...नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?

नेहा चौधरी | Updated: Nov 28, 2023, 01:29 PM IST
VIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ? title=
Boy and Girl married in a moving train video viral on Social media Trending News today

Viral Video : भारतात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. हवी हवीशी वाटणाऱ्या गारे गारे थंडीच्या मोसमात मोठ्या संख्येत थाटामाटात लग्न होताना दिसतात. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज आज प्रत्येकाची लग्नाची संकल्पना वेगळी असते. आजकाल डेस्टिनेशन वेडिंग फाड आलं आहे. समुद्र किनाऱ्यासह मोठं मोठ्या राजवाड्यात लग्न सोहळ होत आहेत. अशातच एका प्रेमी युगुलावर धावत्या ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ आली आहे. 

कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग 

या जोडप्याने मंदिर किंवा मंडपात लग्नाचा निर्णय न घेता धावत्या ट्रेनमध्ये लग्न करुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणी तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, नंतर तिला मंगळसूत्र घातलं. हे अनोख लग्न पाहण्यासाठी ट्रेनमधील प्रवाश्यांनी एकच गर्दी केली होती. हे सगळं पाहून तरुणी तरुणाला मिठी मारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा - Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!

त्यानंतर त्या तरुणीच्या शेजारी असलेल्या एका महिलेने त्यांना फुलांचं हार दिले. तरुण तरुणीने एकमेकांना हात घालून लग्न केलं. लग्नानंतर तरुणी तरुणाच्या पाया पडली. हा अनोख्या लग्न सोहळा ट्रेनमधील प्रवाश्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील max_sudama_1999 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, चालत्या ट्रेनमध्ये लग्न, वाह व्वा काय बात हैं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही नेटकऱ्यांना हा लग्नसोहळा आवडला आहे तर काही नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत  1 लाख 63 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.