पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : आजच्या डिजिटल युगात पेपर बरोबर पुस्तकं वाचणं अनेकांकडून कमी झालं आहे. पूर्वी मोबाईल, टॅब, लॅपटॉप या गोष्टी आपल्या आजूबाजूला नव्हत्या तेव्हा अनेकांना पुस्तके वाचण्याची चांगली सवय होती. पण काळाच्या ओघात आपल्या हातात गॅजेट्स आल्यामुळे पुस्तके वाचण्याची सवय कमी होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही रोज एक पुस्तक वाचले तर तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू शकतात. तसेच पुस्तकं वाचणं ही खूप चांगली सवय आहे, ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारली पाहिजे. चला तर जाणून घेऊयात पुस्तक वाचण्याचे काय आहेत फायदे. (reading amazing benefits)
वाचन का महत्त्वाचे?
तुम्हाला दररोज पुस्तक वाचण्याची सवय आहे का? जर नसेल तर ही सवय लवकरात लवकर सवय लाऊन घ्या. कारण रोज एक पुस्तक वाचण्याची सवय (The habit of reading a book) तुम्हाला आयुष्यातील अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकते. रोज पुस्तक वाचण्याची सवय तुमचे जीवन बदलण्यास मदत करु शकते.
पुस्तक वाचल्याने मेंदूचा व्यायाम
तुम्ही दररोज एखादे पुस्तक वाचले तर तुमच्या मेंदूचा व्यायाम (Brain exercise) होतो. जर तुम्हाला रोज एक पुस्तक वाचण्याची सवय असेल तर तुमचे मन सक्रिय राहते आणि तुमच्या मेंदूची क्षमताही वाढते. तसेच पुस्तक वाचल्याने तुमची स्मरणशक्तीही तीव्र होते.(Reading a book also sharpens your memory) तुम्ही जितकी जास्त पुस्तके वाचता तितकी तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे मन सक्रिय ठेवण्यासाठी ही सवय अंगीकारणे गरजेचे आहे.
तुमचं बोलणं सुधारेल
तुम्ही जेव्हा रोज पुस्तक वाचण्याची सवय लावाल, तेव्हा तुमच्या गोष्टींबद्दलचे ज्ञान वाढेल. पण त्याच वेळी तुमचा शब्दसंग्रही सुधारेल. तुम्ही पुस्तक वाचल्याने दररोज नवीन शब्द शिकताल. यामुळे तुमचे संभाषण कौशल्य (Communication skills) देखील सुधारेल आणि तुमचे बोलण्याचं कौशल्य सुधारेल.
पुस्तक वाचल्याने मन स्थिर
अनेक लोकांना ही समस्या असते की ते कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. लक्ष लागत नसल्याने कोणतेही काम निट होत नाही. म्हणूनच कामाच्या वेळी लक्ष केंद्रीत करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला तुमचा फोकस वाढवायचा असेल तर पुस्तकं वाचण्याची सवय लावा. पुस्तकं वाचल्याने नक्कीच तुमचा फोकस वाढेल.
ताणतणाव कमी
रोज पुस्तके वाचल्याने आपण नवीन गोष्टी शिकतो. यामुळे आपले मन तणावापासून दूर राहते. म्हणूनच पुस्तके वाचून तुम्ही तणावापासून दूर राहता. दररोज काहीतरी नवीन शिकल्याने तुमचे मनोरंजन होते आणि तुम्हाला आनंदही मिळतो.