‘या’ अ‍ॅपने रेल्वे तिकीट बुक केल्यास मिळणार मोफत प्रवासाची संधी

भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिवाळी गिफ्ट देण्याची तयारी केली आहे. रेल्वे तिकीट बुक करणा-यांसाठी एक नवीन योजना आणली आहे.

Updated: Oct 4, 2017, 08:51 PM IST
‘या’ अ‍ॅपने रेल्वे तिकीट बुक केल्यास मिळणार मोफत प्रवासाची संधी title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिवाळी गिफ्ट देण्याची तयारी केली आहे. रेल्वे तिकीट बुक करणा-यांसाठी एक नवीन योजना आणली आहे.

या नव्या योजनेद्वारे तुम्हाला मोफत रेल्वे प्रवास करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला पेमेंट करताना एक काम करावं लागेल. रेल्वेने १ ऑक्टोबरपासून एक लकी ड्रॉ ची स्कीम लॉन्च केली आहे. तुम्ही जर भीम अ‍ॅप आणि यूपीआय अ‍ॅपवरून पेमेंट करत असाल तर तुम्हाला मोफत प्रवास करण्याची संधी मिळू शकते. 

आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं रेल्वे तिकीट भीम अ‍ॅपवरून बुक करावं लागेल. हा लकी ड्रॉ कम्युटराईज्ड पद्धतीने काढला जाईल. या ड्रॉमध्ये एकावेळी ५ लोक विजेते ठरु शकतात. विजयी लोकांना त्यांना त्यांच्या पूर्ण प्रवास मोफत करण्यास मिळेल.  

यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत. बुकींग केल्यावर तिकीट रद्द करणा-या प्रवाशांना लकी ड्रॉमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही. जर एकाच प्रवाशाचा पीएनआर या लकी ड्रॉमध्ये निवडला गेला तर अशात केवळ एकच पीएनआरवर लकी ड्रॉचा फायदा मिळेल. 

लकी ड्रॉमध्ये विजयी झालेल्यांची नावे आयआरसीटीच्या वेबसाईटवर प्रत्येक महिन्यात डिस्प्ले केले जातील. त्यासोबत विजेत्यांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेलवर सुद्धा याची माहिती दिली जाईल. हा लकी ड्रॉ सहा महिन्यांसाठी आहे.