कर्नाटकात सत्तेसाठी भाजपकडून मोठी ऑफर, देवेगौडांचा गौप्यस्फोट

भाजपने पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्यासाठी कर्नाटकात हालचाली केल्याची पुढे आले आहे. याबाबत जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष  देवेगौडा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  

ANI | Updated: Mar 28, 2019, 08:36 PM IST
कर्नाटकात सत्तेसाठी भाजपकडून मोठी ऑफर, देवेगौडांचा गौप्यस्फोट title=

बंगळुरु : भाजपने पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्यासाठी कर्नाटकात हालचाली केल्याची पुढे आले आहे. याबाबत जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच डी देवेगौडा यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना मोठी ऑफर देऊ केली होती, असा दावा देवेगौडा यांनी केला आहे. याबाबत वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, भाजपची ही ऑफर कुमारस्वामी यांनी नाकारली, अशी माहिती देवेगौडा यांनी दिली. निवडणुकीपूर्वी जेडीएससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना मोठी लाच देण्याचा प्रयत्न केला. जेडीएसच्यामदतीने कर्नाटकमध्ये भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, भाजपची मोठी ऑफर कुमारस्वामी यांनी नाकारली. भाजपने जोरदार फिल्डींग लावली होती. त्यासाठी मुंबई कनेक्शन जोडले होते. मात्र, भाजपला यश आले नाही, असे देवेगौडा म्हणालेत.

कर्नाटकामधील जेडीएस-काँग्रसे आघाडी सरकारला धोका असून भाजप सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात असून भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त होते. यानंतर कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप झाला होता. मात्र, कुमारस्वामी सरकार स्थिर राहिले. कर्नाटकातील आमदार रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असल्याचा फोटोही ट्विट केला होता. मी आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचा डाव भाजपवर उलट्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील आणि कर्नाटकमधील राजकीय घडामोडींचा गौप्यस्फोट देवेगौडा यांनी केला आहे. 

कुमारस्वामी यांच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती. निवडणुकीपूर्वी मोठी रक्कम लाचेच्या स्वरुपात देण्यात येणार होती. यासाठी कुमारस्वामी यांना मुंबईत पैसे ठेवलेल्या एका ठिकाणी बोलावण्यास आले होते. मात्र, कुमारस्वामी यांनी ही ऑफर नाकारली, असे देवेगौडा यांनी सांगितले.