Coronavirus : कोरोनापासून वाचण्यासाठी हेमा मालिनी यांनी सांगितला एक अजब दावा, तुम्ही म्हणाल हा कसला दावा?

बॉलिवूडच्या सुपरस्टार असलेल्या आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी एक विचित्र दावा केला आहे.

Updated: Jun 6, 2021, 03:55 PM IST
Coronavirus : कोरोनापासून वाचण्यासाठी हेमा मालिनी यांनी सांगितला एक अजब दावा, तुम्ही म्हणाल हा कसला दावा? title=

मुंबई : देशात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या जरी कोराना संक्रमीत लोकांची संख्या कमी होत असली तरी, काळ्या बुरशी आणि म्यूकरमायकोसीसमुळे लोकं त्रस्त आहेत. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लसीकरण करणे हाच एक महत्वाचा उपाय आपल्याकडे आहे. या कोरोनाकाळात तुम्ही सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी भन्नाट उपाय सुचवलेले पाहिले किंवा ऐकले असणार.

एवढेच काय तर अनेक राजकरणी माणसांनीही यासाठी दावे केले आहेत. परंतु या दाव्यात किती तथ्य आहे? हे त्यांनाच माहित. परंतु सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे आणि लसीकरण या सगळ्यामुळे कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो हे मात्र नक्की.

अशा वेळी बॉलिवूडच्या सुपरस्टार असलेल्या आणि मथुराच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी एक विचित्र दावा केला आहे. त्यांचा दावा आहे की, हवन हा कोरोना रोखण्यासाठी योग्य उपाय आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान, मुंबई येथील हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी पर्यावरण दिना निमित्ताने हवन आयोजित करण्यात आले होते. यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी हवन करणे योग्य आहे.

हेमा मालिनी काय म्हणाल्या?

हेमा मालिनी म्हणाल्या की, "भारतात कोरोना संसर्गा आल्यापासून मी धूप जाळून हवन करत असते. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मी हवन करत असते. जर सकाळी आणि संध्याकाळी हवन करुन धूप केल्याने घरगुती संघर्ष होत नाहीत. धूप बरोबरच गायीचं शुद्ध घी, कडुलिंबाची पाने त्यात घालावेत, ज्यामुळे घराचे वातावरण शुद्ध होते. यासगळ्या गोष्टींमुळे कोणत्याही रोगाला रोखण्यास मदत होते. म्हणून मी रोज हवन करते, तुम्हीही रोज करायला पाहिजे."

देशातील कोरोनाची स्थिती

देशात कोरोना संसर्गामध्ये तीव्र घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1.14 लाख नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. 2 हजार 677 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.