एसडीएमच्या कार्यालयात घुसून भाजप आमदाराचा गोंधळ, केला दबाव तंत्राचा वापर

मध्य प्रदेशमध्ये राजकीय नेत्यांकडून अधिकारी वर्गाला धमकावण्याचे प्रकार सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.  

ANI | Updated: Jul 16, 2019, 10:20 AM IST
एसडीएमच्या कार्यालयात घुसून भाजप आमदाराचा गोंधळ, केला दबाव तंत्राचा वापर title=
Pic Courtesy: ANI

लखनऊ : मध्य प्रदेशमध्ये राजकीय नेत्यांकडून अधिकारी वर्गाला धमकावण्याचे प्रकार सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भाजप आमदाराच्या समर्थकांनी सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून जोरदार गोंधळ घातला. यावेळी अधिकाऱ्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणाही दिल्यात. यावेळी भाजप आमदार महेश राय हे आपल्या समर्थकांसह एसडीएम के. एल. मीना यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी यावेळी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. 

वीज समस्याबाबत भाजप आमदार महेश राय हे आपल्या समर्थकांसह एसडीएमच्या कार्यालयात घुसले. यावेळी त्यांनी वीज समस्येला आपणच जबाबदार आहात. तुम्ही काहीही करत नाहीत. एका आमदाराशी तुम्हाला नीट बोलता येत नाही. दरम्यान, अधिकारी मीना हे शांतपणे त्यांचे बोलने ऐकून घेत आहेत. मात्र, समर्थकांनी गोंधळ घातला. त्यावेळी आमदारही मुर्दाबादच्या घोषणा देत होते. ऐका, तुम्ही येथे नवीन आहात. आपल्याला येथील जाण नाही. आमदाराशी कसे बोलत आहात, असे सांगत अधिकाऱ्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.