'हनुमान हे मुस्लिम, जाट, आदिवासी नव्हे तर चीनी होते', कीर्ती आझाद यांचा दावा

बुक्कल यांच्या वक्तव्याला दिवसही उलटला नसताना हनुमान हे चीनी असल्याचे भाजपा खासदार कीर्ती यांनी म्हटले आहे. 

Updated: Dec 21, 2018, 04:16 PM IST
'हनुमान हे मुस्लिम, जाट, आदिवासी नव्हे तर चीनी होते', कीर्ती आझाद यांचा दावा  title=

नवी दिल्ली : भगवान हनुमान हे आपल्या जाती धर्मावरून देशभरात सध्या चर्चेत आहेत.  राजस्थान विधानसभा निवडणुकी दरम्यान हनुमान हे दलित असल्याचे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. यानंतर हनुमानाच्या जातीवरून राजकारण सुरू झाले होते. भाजपचे खासदार उदित राज यांनी हनुमान आदिवासी असल्याचे म्हटले होते. काल भाजपा नेते बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लिम असल्याचे विधानही केले होते.  मुस्लिम धर्मामध्ये रेहमान, रमजान, फरमान, झिशान, कुर्बान अशी जी नावे हनुमान यांच्या नावावरूनच ठेवली जात असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते. या वक्तव्याला दिवसही उलटला नसताना हनुमान हे चीनी असल्याचे भाजपा खासदार कीर्ती यांनी म्हटले आहे. 

... म्हणून हनुमान जाट होता; भाजप मंत्र्याचा अजब दावा

हनुमानाच्या जाती धर्मावरून आतापर्यंत करण्यात आलेले सर्व दावे कीर्ती आझाद यांनी फेटाळून लावले आहेत. हनुमान हा दलित नव्हता, आदिवासी नव्हता, मुस्लिम नव्हता किंवा जाटही नव्हता तर तो चीनी होता असे कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे. हनुमान चीनी असल्याचा दावा खुद्द चीनी लोकांकडूनच केला जात असल्याची चर्चा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

'हनुमानजी मुस्लिम होते', भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध!​

योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला दलित म्हटल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी लक्ष्मीनारायण चौधरी यांनी हनुमान हा जाट असल्याचे विधान परिषदेत म्हटले होते. दुसरे संकटात असतात तेव्हा जाटच धावून जातो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.