नवी दिल्ली : महाराष्ट्रच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. याचा बिगुल बुधवारी वाचला आहे. अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान अमित शहा यांच्या घरी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
भाजपची मुख्यमंत्री परिषदेची बैठक रात्री १०.३० वाजता संपली. त्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा, अरूण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह यांची वेगळी बैठक झाली. ही बैठक १५ ते २० मिनिट सुरू होती. या दरम्यान सर्व मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेले. पण देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी थांबले होते. वरिष्ठांची बैठक झाल्यावर फडणवीस शहा यांना भेटले त्यानंतर दोघे अमित शहा यांच्या निवासस्थानी रवाना झाले.
सुमारे ११.३० वाजात अमित शहा यांच्या घऱी एक पुन्हा बैठक सुरू झाली. त्यात अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, आशीष शेलार आणि नितेश राणे उपस्थित होते. सुमारे एक तास ही बाठ झाली. त्यानंतर १२.३० च्या दरम्यान राणे, फडणवीस, शेला एकाच गाडीतून अमित शहाच्या घरून रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे भाजपमध्ये सामील होण्यासंबंधी रणनितीवर चर्चा झाली. तसेच एनीसीपीला शिवसेनेचा पर्याय म्हणून पाहवे का यावर चर्चा झाली.