राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, कोण ठरलं भाग्यवान?

भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

Updated: May 29, 2022, 09:18 PM IST
राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, कोण ठरलं भाग्यवान?  title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली, झी मीडिया : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने 10 जूनला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची नावं प्रसिद्ध केली आहेत. (bjp announced 2 rajya sabha candidate ex minister anil bonde and piyush goyal give candidature) 

महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी?

भाजपने महाराष्ट्रातून माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल (Piyush Goyal) या दोघांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. 

पियूष गोयल यांच्याबाबत थोडक्यात

पियूष गोयल यांच्याकडे सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाची सूत्र आहेत. गोयल यांनी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यानंतर सुरेश प्रभू यांनी  2017 मध्ये रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. गोयल यांनी रेल्वे खात्याची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. इतकंच नाही, तर भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नसताता गोयल यांनी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली.  

यूपीतून 16 पैकी 6 उमेदवार

भाजपने 16 उमेदवारांपैकी उत्तर प्रदेशातून 6 उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने यूपीतून दर्शना सिंह आणि संगीता यादव या दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमधून प्रत्येकी दोन आणि मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणामधून प्रत्येकी एका उमेदवाराची नावे जाहीर केली.