मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू आहेत. ज्याबद्दल आपण विचार करत बसतो. परंतु आपल्या तरी देखील त्यामागील कारण माहित नसतं. त्यांपैकी एक आहे इलेक्ट्रिक प्लग. कोणत्याही इलेक्ट्रीक वस्तुला विजाचं कनेक्शन जोडणाऱ्या या प्लगचा आकार किंवा त्याच्या डिझानसंदर्भात अनेक लोकांना प्रश्न पडले आहोत. या इलेक्ट्रिक प्लगचे तसे वेगवेगळे डिझाइन आहे. हे वेगवेगळ्या आकारात येतं. जसं की, दोन पिनचं प्लग किंवा तीन पिनचं प्लग. तसे पाहाता तुम्ही जर नीट विचार केलात, तर तुमच्या लक्षात येईल, अशा इलेक्ट्रीक वस्तु ज्यांना जास्त पावर लागते, अशा वस्तुंना तीन पिनचं प्लग असतं.
जर तुम्ही या इलेक्ट्रिक प्लगमधील पिन काळजीपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला या पिनच्या मध्यभागी एक कट असल्याचे दिसून येईल. हे कट फक्त थ्री पिन इलेक्ट्रिक प्लगमध्येच नाही, तर टू-पिन इलेक्ट्रिक प्लगमध्येही दिसून येतील.
तीन पिन इलेक्ट्रिक प्लगचे दोन प्रकार आहेत. पहिला ज्याची पिन पितळेची असतार आणि दुसरा ज्याचे पिन अॅल्युमिनियमचे असतात. परंतु ज्या पिन पितळेच्या असतात त्या गंजण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांना निकेलने पॉलिश केले जाते. यानंतर, पिनवर कट केले जातात. म्हणूनच त्या पिनचा आकार असा दिसतो.
ब्रास कट मार्क पिन हा विजेचा चांगला वाहक आहे. त्यामध्ये विद्युत प्रवाह अगदी सहजतेने वाहतो, परंतु जर वीज मर्यादेपेक्षा जास्त गेली तर ते पिन गरम होतात. ही पितळी पिन गरम झाल्यामुळे विस्ताळू देखील शकतात. त्यामुळे, ते पसरून सॉकेटमध्ये चिकटू शकते आणि कव्हर देखील खराब होऊ शकते.
त्यामुळे गरम होऊन आकार बदलण्यापासून रोखण्यासाठी, पिनमध्ये एक कट केला जातो. जेव्हा जेव्हा अशा पिनमध्ये वीज वाहते तेव्हा चीरामुळे वीज दोन भागांमध्ये विभागली जाते, त्यामुळे ते लवकर तापत नाही. त्यामुळे त्याचे नुकसान होण्याचा धोका कमी असतो.
त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्ही प्लग घेत असाल, तर कर्ट मार्क आहे की, नाही हे लक्षात ठेवा.
हे 3 पिन प्लग एअर कंडिशनरसारख्या जड वस्तुंसाठी वापरले जातात. ते अधिक वीज वापरतात. परिणामी या प्लगमधून अधिक वीज वाहते. त्यांच्यामध्ये असलेल्या तीन पिनवर कट चिन्ह नसल्यास, लोड वाढल्यावर त्यांचा आकार बदलू शकतो. त्यामुळे त्यामध्ये कट मार्क्स असणे आवश्यक आहे.
थ्री पिन प्लग हे जड ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जातात, जे दीर्घकाळ टिकतात. म्हणून, त्याचे प्लग आणि पिन मजबूत असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते खराब होण्यापासून रोखता येईल.