Nitish Kumar : नितीश कुमार यांचं शपथ घेताच भाजपला आव्हान

 महागठबंधन सरकार अस्तित्वात येताच पुढच्या काही क्षणांत नितीश कुमारांनी भाजपला (Bhartiya Janta Party) चॅलेंज दिलंय.

Updated: Aug 10, 2022, 10:41 PM IST
Nitish Kumar : नितीश कुमार यांचं शपथ घेताच भाजपला आव्हान

पटना :  नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज आठव्यांदा शपथ घेतली. महागठबंधन सरकार अस्तित्वात येताच पुढच्या काही क्षणांत नितीश कुमारांनी भाजपला (Bhartiya Janta Party) चॅलेंज दिलंय.  तर दुसरीकडे नितीश कुमारांचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होतील, असा इशारा भाजपनं दिलाय. (bihar political crisis nitish kumar taking oath as a chief minister)

हे दोन नेते, ज्यांच्यामुळे देशात खळबळ उडाली. यांच्यापैकी एका नेत्याला सोडून शिंदे भाजपमध्ये गेले आणि सत्ता स्थापली. तर दुसऱ्या नेत्यानं भाजपसोबत काडीमोडी करून नवीन सरकार बनवलं. 

महाराष्ट्रात शिंदे गटाच्या बंडानंतर भाजप विरोधक सैरभैर झालेले असतानाच महिनाभरातच नितीशकुमारांनी भाजपशी फारकत घेत आरजेडीसोबत सत्ता स्थापन केलीसुद्धा. एवढंच नाही तर शपथ घेतल्यावर काही मिनिटांतच नितीशकुमारांनी भाजपला थेट आव्हान दिलं.

नितीश कुमारांचं हे पाऊल शहाणपणाचं म्हणत पवारांनी त्यांची पाठ थोपटली. तर फडणवीसांनी मात्र पवारांचं दुःख वेगळंच म्हणत निशाणा साधला.

भाजप प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केल्यामुळे नितीश कुमारांनी थेट भाजपसोबतचा संसारच संपुष्टात आणला. त्यामुळे 2024 मध्ये मोदींना टक्कर देणारं नेतृत्व म्हणून विरोधकांचा तंबू नितीशकुमारांच्या आधारानं उभा राहू शकतो.

उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला, म्हणून त्याचे परिणाम भोगावे लागले, असं म्हणत भाजपच्या सुशील मोदींनी नितीशकुमारांना इशारा दिलाय. आता नितीश कुमारांचे उद्धव ठाकरे होणार की त्यांनी दाखवलेल्या हिमतीमुळे प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात बळ मिळणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय.