अबब! घरी जायला गाडी नसल्याने पठ्ठ्याने लावलेलं डोकं पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

  तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल पण वाहन मिळत नसेल तर तुम्ही काय कराल?, हे माहित नाही. मात्र एका पठ्ठ्याने घरी जायला गाडी भेटत नव्हती म्हणून जे डोकं लावलं ते वाचून तुम्हीही डोक्याला हात लावताल.

Updated: Aug 10, 2022, 10:24 PM IST
अबब! घरी जायला गाडी नसल्याने पठ्ठ्याने लावलेलं डोकं पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Crime News :  तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल पण वाहन मिळत नसेल तर तुम्ही काय कराल?, हे माहित नाही. मात्र एका पठ्ठ्याने घरी जायला गाडी भेटत नव्हती म्हणून जे डोकं लावलं ते वाचून तुम्हीही डोक्याला हात लावताल. ही घटना आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील आहे. 

नेमकं काय घडलं?
राजम येथून विद्यार्थ्यांची विशेष बस गावात आली होती आणि मुलांना सोडल्यानंतर चालकाने बस वंगारा पोलील ठाण्यासमोर लावली. दुसऱ्या दिवशी चालक बस घ्यायला ठाण्यासमोर गेला तर पाहतो तर काय तिथून बस गायब झाली होती. चालकाला तर धक्काच बसला त्यानंतर त्याने आगारातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. 

आंध्र प्रदेश रोडवेजच्या अधिकाऱ्यांनी वंगारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिस अधिकाऱ्यांनी APSRTC कर्मचाऱ्यांच्या मदतीने आजूबाजूच्या गावात शोध सुरू केला. अनेक तास शोध घेतल्यानंतर ही बस रेगडी अमदलवलसा मंडळाच्या मीसाला दोलापेटा येथे असल्याची माहिती मिळाली.

वंगारा पोलीस अधिकारी मीसाला दोलापेटा  इथे गेले, बसच्या स्टेअरिंगवरचे बोटांचे ठसे घेतले. त्यानंतर त्यांनी बस वंगारा येथे नेली. बस कोणी चोरली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही संशयितांची चौकशी केली. या चौकशीवेळी सुरेश चौधरी व्यक्तीने बस चोरी केल्याची कबुली दिली. चोरी का केली हे कारण ऐकल्यावर पोलिसही शॉक झाले.

चोरीचं कारण
राजमहून वंगारा येथे पोहोचला, त्यानंतर मला गावात यायला गाडी सापडली नाही.  मला तिथे एक बस उभी असलेली दिसली. ती बस घेऊन मी घरी आलो. त्यावेळी मी दारूच्या नशेत ही चोरी केल्याचे सुरेशने सांगितले. 

दरम्यान, सुरेशने जरी कबुली देत आपण दारूच्या नशेत चोरी केल्याचं म्हटलं असलं तरी पोलिसांनी मात्र त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.