Gold Price Today: तब्बल 4235 रुपयांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीची चमकही कमी

मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 51365  रुपये प्रति तोळे इतके झाले आहे

Updated: Mar 23, 2022, 02:13 PM IST
Gold Price Today: तब्बल 4235 रुपयांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीची चमकही कमी title=

मुंबई : मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 51365  रुपये प्रति तोळे इतके झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचे भाव 55,600 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले होते. चांदीची किंमतही दोन आठवड्यांपूर्वी 70 हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. ते आज MCXवर चांदीचे दर  68614 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.

15 दिवसांत सोन्याचा भाव 4,235 रुपयांनी खाली आला आहे. या महिन्याच्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात MCX वर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता.

जागतिक बाजारात तेजी

भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. न्यूयॉर्क मार्केटमध्ये सोने 0.031 टक्क्यांनी 1,922.28 डॉलर प्रति औंसवर विकले जात आहे. तसेच, चांदीच्या दरात देखील 0.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर चांदी 24.84 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

मुंबईतील सोन्याचे दर

  • 24 कॅरेट 52,100  रुपये प्रति तोळे
  • 22 कॅरेट 47,750 रुपये प्रति तोळे

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या किमतीत आणखी मोठी घसरण होऊ शकते. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून ते जागतिक बाजारपेठेत विकण्याची तयारी सुरू आहे.

सोन्याचा हा साठा बाजारात आल्यास त्याचा बाजारातील पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते. पण हे कधी शक्य होईल हे सांगता येत नाही.