मुंबई : सध्या दोन भावाच्या प्रेमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाचा जीव वाचवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगा छतावरून खाली पडत आहे, ज्याला खाली उभ्या असलेल्या त्याच्या मोठ्या भावाने वाचवले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण खाली उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात पाण्याचा पाइप दिसतो. मग अचानक त्याचा भाऊ वरून पडतो. खाली उभ्या असलेल्या तरुणाने जीवाची पर्वा न करता हातातील पाईप फेकून छतावरून खाली पडणाऱ्या भावाला पकडले. दोघेही एकाच वेळी जमिनीवर पडतात. यादरम्यान त्यांना किरकोळ दुखापतही झाली.
ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.