Woman Working On Laptop In Traffic: ट्रॅफिकमुळे Work From Bike करणाऱ्या महिलेचा फोटो Viral! फोटोवरुन सुरु झाला नवा वाद

Woman Working On Laptop Amid Traffic: सोशल मीडियावर हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून या फोटोमुळे इंटरनेटवरील लोकांचे दोन गट पडले आहेत. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2023, 01:48 PM IST
Woman Working On Laptop In Traffic: ट्रॅफिकमुळे Work From Bike करणाऱ्या महिलेचा फोटो Viral! फोटोवरुन सुरु झाला नवा वाद title=
Woman Working On Laptop In Traffic

Woman Working On Laptop Amid Traffic: देशाचं आयटी हब अशी ओळख असलेलं शहर म्हणजे बंगळुरु! (Bengaluru) या शहरातील कॉर्परेट कल्चरची देशभरामध्ये चर्चा असता. सोशल मीडियावर बंगळुरुच्या कॉर्परेट कल्चरबरोबरच चर्चा असते ती येथील ट्रॅफिकची (Bengaluru Traffic). सतत वाहतुकोंडी असणारं शहर अशी नोकशी ओळख या शहराने मिळवली आहे. अनेकदा येथे वाहनांमधून प्रवास करण्याऐवजी चालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येईल अशीही स्थिती असते. येथील ट्रॅफिकची परिस्थीती इतकी भयंकर आहे की अर्ध्या तासांचा प्रवास असेल तर किमान 2 तास आधी घर सोडावं असा सल्ला नवख्या लोकांना दिला जातो. याच ट्रॅफिकचा आणि त्याचा कॉर्परेट कल्चरशी असलेला संबंध अधोरेखित करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

फोटो आणि कॅप्शन चर्चेत

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक महिला चक्क स्कुटीवरच लॅपटॉप ओपन करुन काम करत असल्याचं दिसत आहे. रॅपिडोच्या सहाय्याने बुक केलेल्या बाईकवर मागील सीटवर बसलेली ही महिला लॅपटॉप सुरु करुन ट्रॅफिक जॅममध्येच काम करताना दिसतेय. हा फोटो या महिलेच्या बाईकच्या बाजूला उभ्या असलेल्या कारमधून क्लिक करण्यात आला आहे. निहार लोहिया नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवरुन हा फोटो शेअऱ केला आहे. लोहिया यांनीच आपल्या कारमधून हा फोटो काढला आहे. बाजूला असलेल्या स्कूटीवरील महिला ट्रॅफिकमध्ये वाहनं थांबलेली असताना लॅपटॉपवर काम करताना पाहून लोहिया यांनी आश्चर्य वाटलं आणि त्यांनी हा क्षण कॅमेरात कैद केला. ट्रॅफिकमुळे ऑफिसला पोहचण्यास उशीर होत असल्याने वेळेत काम सुरु करण्याच्या उद्देशाने या महिलेने वर्क फ्रॉम बाईक सुरु केलं. "बंगळुरुमधील कल्चर दर्शवणारा फोटो. ऑफिसला जाताना रॅपिडो बाईकवर काम करणारी ही महिला," अशी कॅफ्शन लोहिया यांनी या फोटोला दिली आहे.

पडले दोन गट

हा फोटो पाहून इंटरनेटवर दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. अनेकांनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या महिलेची कामाप्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा पाहून काहींनी तिचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे हे असं वर्क कल्चर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचं काहींनी म्हटलं आहे. बंगळुरुसारख्या शहरांमध्ये वर्किंग अवर्स म्हणजेच कामाचे तास हे फ्लेक्जिबल असायला हवेत. म्हणजेच काही कारणाने ऑफिसला पोहचण्यास उशीर झाला तर तितका वेळ अधिक काम करुन त्याची भरपाई करण्यास परवानगी दिली जावी असं काहींचं म्हणणं आहे. अशी परवानगी दिली आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी कंपन्यांनी समजून घेतल्या तर या महिलेप्रमाणे कोणाला तारेवरची कसरत करुन वेळेत लॉगइन करण्याचं बंधन राहणार नाही, असा युक्तीवाद काहींनी केला आहे.

बंगळुरु शहरामधील बंगळुरु साऊथ येथील कोरामंगलमच्या चौकात हा फोटो काढल्याचं लोहिया यांनी लोकेशन टॅग करत म्हटलं आहे.