मुंबई : प्रसिद्ध गायिकेचं निधन झाल्याने कला विश्वास शोककळा पसरली आहे. बंगाली आणि ओडिया भाषांमध्ये या गायिकेनं आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रसिद्ध गायिका निर्मला मिश्रा या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या दक्षिण कोलकाता भागातील चेतला परिसरात राहात होत्या. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 12.05 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. निर्मला यांना कला विश्वातील लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घरी उपचार हवे होते
गायिका निर्मला मिश्रा यांचा वैद्यकीय उपचारांवर विश्वास नव्हता. त्या रुग्णालयात जाण्यासाठी टाळाटाळ करायच्या. घरच्यांनी सांगितले की, त्या घरीच उपचाराचा आग्रह धरायच्या.
त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. यापूर्वीही त्यांना अनेकदा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयात जायला तयार नसल्याने घरीच यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना यापूर्वी तीन दोन हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता.