Bank Holiday In August: सध्या देशात लॉकडाऊननंतर सणांचा माहोल आहे. त्यातून ऑगस्ट महिन्यात सणांची रेलचेल असते आणि म्हणता म्हणता उद्यापासून ऑगस्टचा महिनाही सुरू होत आहे. आता याचा परिणाम म्हणून बँकांनाही भरपूर सुट्टया जाहीर झाल्या आहेत.
टेक्नोलॉजीच्या साहाय्याने बँकेची कामं सहजरीत्या होऊ शकतात परंतु शहरात टेक्नोलॉजी आणि एप्सचे वापरकर्ते अधिक असले तरी ग्रामीण भागात मात्र अद्याप अनेक नागरिक हे स्वतःहून बँकेत जाऊन आपली कामं पुर्ण करतात. त्यामुळे त्यांना यासंदर्भात विशेष तयारी करावी लागणार आहे. ज्यांना आपली बँकेची कामं पुर्ण करायची आहेत त्यांना पुढच्या महिन्यात फारच कमी वेळ मिळणार आहे.
ऑगस्टमध्ये एकूण बँकांना 17 दिवस सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये राज्यनिहाय सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे तुमच्या राज्यातील बँका 17 दिवस बंद असतीलच असे नाही. बँकेच्या सुट्ट्या 2 प्रकारच्या असतात. राष्ट्रीय आणि प्रादेशिक. राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देशभरातल्या बँका बंद असतात तर प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी फक्त संबंधित राज्यातील बँका बंद असतात. आरबीआयच्या तत्त्वांनुसार रविवार वगळता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.
पुढील महिन्याच्या सुट्ट्या या खालीलप्रमाणे आहेत. त्याद्वारे तूम्ही तूमच्या बँकांच्या सृट्टीचे प्लॅनिंग करू शकता.
1 ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (सिक्किम)
7 ऑगस्ट: 2022 चा पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट: मुहर्रम (जम्मू और कश्मीर )
9 ऑगस्ट: मुहर्रम (अगरतल्ला, अहमदाबाद, अइज़ोल, बेलापुर, बेंगलुरु, भोपाल, चेन्नई, हैदराबाद, जयपुर, कानुपर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नई दिल्ली, पटना, रायपुर, रांची)
11 ऑगस्ट: रक्षाबंधन (संपुर्ण देशात सुट्टी)
12 ऑगस्ट: रक्षाबंधन (कानपुर,लखनऊ)
13 ऑगस्ट:-दूसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट:-रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट: पारसी नववर्ष (मुंबई,नागपुर सुट्टी)
18 ऑगस्ट: जन्माष्टमी (संपुर्ण देशात सुट्टी)
19 ऑगस्ट: जन्माष्टमी /कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाल, चंडीगढ़, चेन्नई, गंगटोक, जयपुर, जम्मू, पटना, रायपुर, रांची, शिलॉन्ग, शिमला)
20 ऑगस्ट: श्री कृष्णा अष्ठमी (हैदराबाद)
21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट: श्रीमंत शंकरदेव तिथी (गुवाहटी)
31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक)