नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता उत्तर भारतात विमानांचे उड्डाण पूर्ववत होणार आहे. अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, जम्मू विमानतळ बंद करण्यात आले होते. २७ मेपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिने प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लगेचच हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या विमानतळांवरून वाहतूक सुरू राहील.
दरम्यान, पाकिस्तानच्या कुरापती बघता मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई विमातळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समजा जर हल्ला झालाच तर कशापद्धतीनं हा हल्ला परतवून लावायचा यासाठी मुंबई विमानतळावर मॉकड्रील करण्यात आले.