नवी दिल्ली : 'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे. रामदेव बाबांनी पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमीटेड नावाची सिक्युरिटी फर्म लॉन्च केली आहे.
महिला असो किंवा पुरुष सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त स्वत:चीच नाही तर देशाचीही सुरक्षा करतील अशी माणसं तयार करणं आमचा उद्देश असल्याचं पतंजली आयुर्वेद संस्थानचे सीईओ आचार्य बालकृष्ण म्हणाले आहेत.
निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलिसांना या तरुणांना तयार करण्याची आणि योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आल्याचं बालकृष्ण यांनी सांगितलं आहे. रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं त्यांना भारताचा २५वा सगळ्यात श्रीमंत माणूस बनवलं आहे. पतंजलीची एकूण संपत्ती २५,६०० कोटी रुपये आहे.