नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या निकाल वाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी शिया वक्फ बोर्डाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने शिया वक्फ बोर्डाने फैजाबाद न्यायालयाच्या १९४६ मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाला ही आव्हान याचिका दाखल केली होती. ती फेटाळण्यात आली आहे.
Chief Justice of India Ranjan Gogoi: We have dismissed the Special Leave Petition(SLP) filed by Shia Waqf Board challenging the order of 1946 Faizabad Court #AyodhyaJudgment pic.twitter.com/hbwibSA3ov
— ANI (@ANI) November 9, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल वाचण्यास सुरुवात झाली. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. आज या निकालावर वाचन सुरु झाले आहे.
Supreme Court: The claim of Nirmohi Akhara is only of management. Nirmohi Akhara is not a 'Shabait'. Arguments were made on archaeology report. Archaeological Survey of India's credentials are beyond doubt and its findings can’t be neglected #AyodhyaJudgment https://t.co/2EgXqByewz
— ANI (@ANI) November 9, 2019
दरम्यान, निर्मोही आखाड्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळली. निर्मोही आखाडा सेवक असल्याचे न्यायालयाकडून अमान्य करण्यात आले आहे. मात्र, रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्त्व न्यायालयाने मान्य असल्याचे नमूद केले आहे. रामजन्मभूमी व्यक्ती नाही, पण भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधली गेली नाही. गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये हिंदू खुणा सापडल्याचा पुरातत्व खात्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. प्रभू रामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. तर मुस्लीम याला बाबरी मशीद मानतात. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे न्यायालायने म्हटले आहे.