अयोध्या : अयोध्येत निर्माण होणारे भव्य श्रीराम मंदिर पुढील 2 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांना भव्य मंदिरात राम ललाचे दर्शन घेता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
या महिन्यात पूर्ण होणार पाया
विश्व हिंदू परिषद (VHP)चे नेता गोपाल यांनी म्हटले की, श्रीराम मंदिराचा पाया याच महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणाच्या शक्यता आहे. सध्या 40 फूट खोल पायाची निर्मितीचे काम सुरू आहे. मंदिराच्या पायाचे काम पूर्ण झाल्यानंतर मिर्झापूर आणि बंगळुरूवरून ग्रेनाइटने बनलेल्या दगडांचा वापर लवकरच सुरू होणार आहे.
वेग वेगळ्या राज्यांमधून दगड
मंदिराच्या निर्माणामध्ये वापरात येणारे ग्रेनाईट बंगळुरूवरून मागवण्यात येणार आहे. तसेच मंदिर निर्माणासाठी वापरात येणारे दगड राजस्थानच्या पहाडपूरवरून आणण्यात येणार आहे. याशिवाय राजस्थानच्या जोधपूर, मकराना, आणि उत्तरप्रदेशातील मिर्झापूरवरूनही दगड मागवण्यात येणार आहे.
गोपाल यांनी म्हटले की, मंदिर 360 फुट लांब,235 फुट रुंद आणि 161 फुट उंच असणार आहे. मंदिराचे एकूण 5 शिखर असतील. यामध्ये सर्वात उंच शिखर 161 फुट उंच असेल. हे मंदिर तीन मजल्याचे असणार आहे.