Bhaubeej 2021: रक्षाबंधन प्रमाणेच भाऊबीज हा देखील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज (Bhaubeej) साजरी करण्याची प्रथा जुनी आहे. भाऊ-बहिणीच्या स्नेहाच्या या सणाचे महत्त्वही रक्षाबंधनापेक्षा कमी नाही. भाऊबीजच्या दिवशीही बहिण भावाला टिळकपूजन करते. भावाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा ठेवते. (Shubha muhurta for bhaubeej)
भाऊ आपल्या बहिणीला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो. भाऊबीज हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो ज्याला यम द्वितीया असेही म्हणतात. जाणून घ्या या वर्षी भावाला ओवाळण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे.
या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये भाऊबीज 6 नोव्हेंबरला येत आहे. या दिवशी, दुपारी 1:10 ते 3:22 पर्यंतचा मुहूर्त सर्वात शुभ आहे. म्हणजेच शुभ मुहूर्ताची एकूण वेळ 2 तास 12 मिनिटे आहे.
भाऊबीजची पूजा पद्धतही रक्षाबंधना प्रमाणेच आहे. या दिवशी सकाळी देवाची पूजा केल्यानंतर बहिणी आपल्या भावांसाठी जेवण बनवतात. भावाला ओवाळतात. मनात एकच इच्छा असते की देवाने आपल्या भावाला प्रत्येक संकटातून वाचवावे. पुराणात भाऊबीजशी संबंधित वेगवेगळ्या कथा आहेत.