IOC तुमच्या शहरात आणत आहे Charging Station, येत्या 3 वर्षात 10 हजारापर्यंत लक्ष

IOC EV charging station : इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांसाठी खुश खबर आहे. इंडियन ऑईल आता शहरा शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करीत आहे. 

Updated: Nov 6, 2021, 03:00 PM IST
IOC तुमच्या शहरात आणत आहे Charging Station, येत्या 3 वर्षात 10 हजारापर्यंत लक्ष title=

नवी दिल्ली : देशभरात इलेक्ट्रिक वाहनाची क्रेझ वाढत आहे. पेट्रोल-डिझेलची वाढती किंमत आणि प्रदुषण पाहता, लोक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. जर तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन आहे तर, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तुमच्या शहरात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. कंपनीचे चेअरमन एसएम वैद्यचे म्हणणे आहे की, पुढील तीन वर्षात 10 हजार EV चार्जिग स्टेशन सुरू करण्याचे लक्ष आहे.

12 महिन्याच्या आत 2 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशनचे लक्ष
कंपनीनीचे म्हणणे आहे की, पुढील 12 महिन्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जातील. याशिवाय 8 हजार चार्जिंग स्टेशन, पुढील 2 वर्षात लावण्यात येतील. जेणेकरून 10 हजार इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशनचे टार्गेट पूर्ण करता येईल.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटले की, सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी पूर्ण देशात चार्जिग स्टेशनचे इंफ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीला स्थापित करण्याच्या दृष्टीने वेगाने काम करीत आहे.

भारत मोठी बाजारपेठ
देशातील GDP मध्ये ऑटो इंडस्ट्रीचे योगदान 6.4 टक्के आहे. तसेच या सेक्टरचे GST कलेक्शनमध्ये 50 टक्के वाटा आहे. महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटले आहे की, जगात भारत चौथी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. तसेच मोदी सरकारने ऑटो इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी 1.5 लाख कोटी उत्पादन आधारीत प्रोत्साहन योजना आणली आहे.