मुंबई : पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत तसेच विमा योजना सुरू असतात. या योजनेअंतर्गत कमी पैशाची गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसची अशी एक विशेष योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. ही योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना होय. या योजनेअंतर्गत 50 रुपये प्रतिदिवस म्हणजेच एका महिन्यात 1500 रुपयांची बचत करणे आवश्यक ठरेल.
मिळणार 35 लाख रुपये
पोस्टाच्या या योजनेत नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला 31 ते 35 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत जीवन विम्याचाही लाभ मिळतो. ही योजना सुरू केल्यानंतर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते.
हे आहेत गुंतवणूकीचे नियम
- 19 ते 55 वर्षे वय असलेला कोणताही नागरीक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
- या योजनेत किमान विमा रक्कम 10 हजार रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- या योजनेचा प्रीमियम दर महिना, दर तिमाही, दर सहा महिन्यांनी किंवा दर वर्षाला देखील केला जातो.
- प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली जाते. तुम्ही या योजनेवर कर्ज देखील घेऊ शकता.
- ही योजना सुरू केल्यानंतर 3 वर्षांनंतर तुम्ही सरेंडर करू शकता. परंतु असे केल्यास तुम्हाला योजनेचा फायदा होणार नाही.
इतका होणार फायदा
19 वर्षाहून अधिक वयाची कोणतही व्यक्ती योजनेत गुंतवणूक करू शकते. समजा तुम्ही 10 लाख रुपयांचा पॉलिसी खरेदी केली तर त्याचे 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये असणार आहे. तर 58 वर्षासाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशावेळ पॉलिसीधारकाला 55 वर्षांनी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांनी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांनी 34.60 लाख रुपयांच्या मॅच्युरिटीचा फायदा मिळू शकतो.