बलात्कार प्रकरणात नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड

नारायण साईला कोर्टाने सुनावली शिक्षा

Updated: Apr 30, 2019, 06:00 PM IST
बलात्कार प्रकरणात नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाखांचा दंड title=

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर आज कोर्टाने नारायण साईला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच १ लाखाचा दंड देखील ठोठावला आहे. काही दिवसांपूर्वीच बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला कोर्टाने दोषी ठरवलं होतं. सूरतच्या सेशस कोर्टाने शुक्रवारी नारायण साईला दोषी ठरवलं होतं. नारायण साईला सरकार पक्षाने जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने ४ वर्षाची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

सूरतच्या राहणाऱ्या २ बहिणींनी नारायण साईंवर बलात्काराचा आरोप केला होता. कोर्टाने यानंतर नारायण साईला दोषी ठरवलं. पोलिसांनी पीडित बहिणींचा आरोप आणि काही पुरावे गोळा केल्यानंतर नारायण साई विरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण साई आणि आसाराम बापू यांच्या विरोधात करण्यात आलेला आरोप ११ वर्ष जुना आहे. पीडितेच्या छोट्या बहिणीने पुरावे दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. तर पीडितेच्या मोठ्या बहिणीने आसाराम बापुच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

आसाराम बापुविरोधात गांधीनगर कोर्टात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. नारायण साईच्या विरोधात कोर्टाने आतापर्यंत ५३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. नारायण साईवर जेलमध्ये असताना पोलिसाला १३ कोटींची लाच देण्याचा देखील आरोप आहे.