'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 30, 2023, 01:23 PM IST
'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी title=

Rajasthan News : सीमा हैदर - सचिन मीनाचे प्रकरण ताजे असतानाच नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी (Facebook friend Nasrullah) भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू (Anju) नावाच्या महिलेनं तिचा धर्म आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अशातच आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून (Pakistan) फोन करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानातून फोनवर धमकी

नसरुल्लाहसाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असते. अंजूने आधी काही दिवसांत आपण भारतात परतणार आहे, असे सांगितले होते. मात्र आता तिने नसरुल्लासोबत पाकिस्तानात निकाह केला आहे. अंजू आता पाकिस्तानाच जमिनीसह मालमत्तेची मालकही बनली आहे. त्यानंतर आता अंजूने पती अरविंदला पाकिस्तानातून फोन करून खूप धमकावल्याचं वृत्त समोर आले आहे. अंजूनेही पतीला शिवीगाळ करत दोन्ही मुलांना घेऊन जाण्याची धमकी दिली आहे. पती अरविंदला पाकिस्तानातून फोन करून अंजूने धमकी दिली. यावेळी तिने अरविंद यांच्यावर शिवीगाळ करत मी काय करु शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असे म्हटलं आहे अंजूने अरविंदला धमकी दिली की ती तिच्या मुलांसाठी भारतात येईल. दोघांमधील फोनवरची ही चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुलांना घेऊन जाणार

"तू माझ्याबद्दल कॅमेऱ्यासमोर खूप काही सांगतोस. तुझ्याबद्दलही काहीतरी सांग. माध्यमे तुाला नाचायला लावत आहे आणि तसा तू नाचत आहेस. तू कसा माणूस आहे हे सगळ्यांना का सांगत नाही? माझी मर्जी आहे मी मला हवं तिथे राहू शकते. तू कोण आहेस मला थांबवणारा? मी तुझ्यावर थुंकते. अशी व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासोबत मी राहत होते हे माझे दुर्दैव आहे. मी भारतात येईन आणि माझ्या मुलांनाही घेऊन जाईन," असे अंजूने म्हटलं आहे.

अरविंदला धमकी दिल्यावर त्याने अंजूला सांगितले की तू माझ्यासाठी मेली आहेस. तू पाकिस्तानात जाऊन नाचते आहेस. तुझे लग्न झाले आहे आणि तू खोटे बोलत आहेस. 2 मिनिटे 55 सेकंदाच्या या ऑडिओमध्ये दोघांनीही एकमेकांसाठी अपशब्द वापरले आहेच. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नसरुल्लाहसह केला विवाह

दोन मुलांची आई असलेल्या अंजूने फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लासह विवाह केला आहे. अंजूने तिचे नाव बदलून फातिमा ठेवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. अंजू आणि नसरुल्लाहची मैत्री 2019 मध्ये फेसबुकवर झाली होती. त्यानंतर व्हिजा मिळवून अंजू नसरुल्लाहला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर पाकिस्तानी पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. यासोबत तिचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत ज्यामध्ये ती नसरुल्लाहसह पाकिस्तानात आनंदात फिरत आहे.

राजस्थानच्या अलवर येथे राहणारी अंजू 21 जुलै रोजी पती आणि दोन मुलांना सोडून पाकिस्तानातात निघून गेली होती. अंजूने पतीला आपण जयपूरला जात असल्याचे खोटे सांगितले होते. अंजू अलवर येथून दिल्ली आणि तिथून अमृतसरला पोहोचली. यानंतर ती वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेली. प्रवासादरम्यान ती पतीशी व्हॉट्सअॅपवर बोलत देखील होती. मात्र, लाहोरला पोहोचल्यानंतर तिने आपण पाकिस्तानात असल्याचे सांगितले.