Lack Of Sex Hormones Symptoms : पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन्स (Testosterone Hormone) असतात. या सेक्स हॉर्मोन्सचं प्रमाण कमी जास्त होत असतं. पुरुषांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचं वय जसजसं वाढतं त्यानुसार हे प्रमाण कमी होतं आणि स्तर घटतो. दरम्यान जर पुरुषांच्या शरीरात सेक्स हॉर्मोन्सचं कमी झाले तर काही लक्षणं दिसून येतात. एकाप्रकारे शरीर आपल्या सेक्स हॉर्मोन्स कमी झाले आहेत याचे संकेत देत असतं. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत हे जाणून घ्या.
सेक्स हॉर्मोन्सला टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोन असंही म्हणतात. हे पुरुषांच्या शरीरात तयार होता. या हार्मोनमुळे पुरुषांमध्ये सेक्सची इच्छा कमी किंवा जास्त होत असते. लैंगिक संबंधांमध्ये हे सेक्स हॉर्मोन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. दरम्यान जर पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये घट झाली की त्याचे परिणाम शरीरावरही होऊ लागतो.
पुरुषांच्या शरीरातील सेक्स हार्मोनमध्ये घट होते तेव्हा त्याचा परिणाम मूडवरही होतो. सेक्स हार्मोन्स मकी असल्यास याचा परिणाम भावनांवरही होतो आणि त्यात बदल होऊ लागतात. यामुळे मूड बदलू शकतो.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता निर्माण झाली तर अशक्त असल्यासारखं वाटतं. आपल्या शरीरात काही ताकद नाही असं त्यांना वाटतं. याचा शरीरातील स्नायूंवर मोठा परिणाम होतो. कारण या परिस्थितीमध्ये पुरुषांच्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात.
जेव्हा पुरुषांच्या शरिरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता होते तेव्हा त्यांना सेक्स करण्याची इच्छा देखील होत नाही. या हार्मोनच्या कमतरतेमुळे पुरुष शारिरीक संबंधांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. असं झाल्यास नात्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. जर सेक्स हॉर्मोन्सची कमतरता असेल तर ते शारिरीक संबंध ठेवण्यास नकार देतात.